श्री दत्त अवतार

श्रीदत्तगुरू या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपरा मोठी आणि लोकप्रिय आहे. त्यातून सिद्ध झालेले वेगवेगळे पंथ तसंच संतांचा या लेखात सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.


थोडक्यात....

श्री दत्त अवतार परंपरा

श्री गुरु दत्तात्रेय...
माता पिता - अनसूया/अत्रि.
जन्म स्थान - माहुर (नांदेड )
निवासक्षेत्र - गिरनार (गुजराथ )
वेष - अवधूत
जयंती - मार्गशीर्ष शु.15

श्रीपादवल्लभ....
माता पिता - सुमती/अप्पलराज.
जन्मस्थान - पीठापुर (आन्ध्र प्रदेश)
निवासक्षेत्र - कुरगड्डी (कुरवपूर) कर्नाटक.
वेष - ब्रम्हचारी
जयंती - भाद्रपद शु. 4

श्रीनृसिंहसरस्वती....
माता पिता - अंबा./माधव.
जन्मस्थान - लाड कारंजा  (वाशीम महाराष्ट्र )
निवासक्षेत्र - नरसोबावाडी, औदुंबर गाणगापूर..
वेष - संन्यासी
जयंती - पौष शु. 2

श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट....
माता पिता - ( --------- )
जन्मस्थान - कर्दळीवनात वारुळातून प्रगट.
निवासक्षेत्र - अक्कलकोट (24 वर्षे )
वेष - संन्यासी दिगंबर
जयंती - चैत्र शु. 2

●पिठापूर, कुरवपूर, कडगंची, गाणगापूर व अक्कलकोट श्री स्थाने अतिशय पवित्र व जागृत आहेत.

●कुरवपूर येथे तर साक्षात श्रीपादवल्लभांनी 14 वर्ष अनुष्ठान केले आहे. ही जागा नामस्मरण, पारायणासाठी खूप चांगली आहे...

श्रीगुरुदेवदत्त

पादुका दर्शन हां दत्त संप्रदायामधील एक अत्यंत वेगळा अनुभव आहे ।विविध श्री दत्त क्षेत्री विविध प्रकारच्या पादुका ::

1 श्री विमल पादुका = औदुम्बर
2 श्री मनोहर पादुका = वाड़ी
3 श्री निर्गुण पादुका = कारंजा
4 श्री निर्गुण पादुका = गाण गापुर
5 श्री निर्गुण पादुका = लातूर
6 श्रीपाद श्रीवल्लभ पादुका = कुरवपुर
7  श्री करुणा पादुका = कड़ गंची
8 श्री स्वामी समर्थ पादुका = अक्कलकोट
9 श्रीपाद श्रीवल्लभ पादुका = पीठा पुर
10 श्री दत्त पादुका = गिरनार
11 श्रीशेष दत्त पादुका = बसव by कल्याण
12 अवधूत पादुका = बाळे कुन्द्री
13 प्रसाद पादुका = वासुदेव निवास ।।