गुरूचरित्र

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.


अध्याय एकोणीसावा

हो हा संन्यासी म्हणून । भिक्षा मागे शिव आपण । हिरण्यकशिपु दारण । करितां नखें तापलीं ॥१॥

जो विज्ञैकगम्य हरि । तो श्रीदत्त औदुंबरीं । शांत होतां तयावरी । वास करी श्रीसहित ॥२॥

दे मार्ग कृष्णा तया । द्वीपीं राहे योगिनी तया । भिक्षा देती पूजूनियां । नेणूनिया विप्र म्हणती ॥३॥

न स्वछंदी गांवीं जायीं । पाहूं येथें काय खायी । ऐसें म्हणुनि ते ठायीं । राहता येयी भय त्याला ॥४॥

तत्रत्य नर गंगानुज । भावें आला त्या गुरुराज । दाखवूनी तेथील गुज । देती निजप्रीती वर ॥५॥

तो नमूनी त्रिस्थली पुसे । क्षणें गुरु दावितसे । गुरु जाऊं म्हणतसे । दुःख होतसे योगिनीसी ॥६॥

न गूढाः केपि में चेष्टा । विदुरित्येष पादुके । विन्यस्याश्र्वास्य ताः प्राप । श्रीगुरुर्गाणगापुरुम् ॥७॥

इति श्री०प०प०वा०स० योगिनीवरदानं नाम एकोनविंशो०