श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


अभंग १

देवाच्या द्वारांत चारी मुक्ती

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥१॥

हरिनामांत अगणित पुण्य.

हरींमुखें म्हणा हरीमुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥

संसारातच परमार्थ अशीं वेदांची ग्वाही.

असोनि संसारी जिव्हें वेगू करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥

द्वारकेचा राणा पांडवांचे घरी.

ज्ञानदेव म्हणे व्यासचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवाघरीं ॥४॥