गणपतीचे अष्टावतार

आता आम्ही तुम्हाला भगवान गणपतीच्या ८ अवतारांबद्दल माहिती देतो. बाकी देवतांप्रमाणेच गणपतीनेही असुरी किंवा राक्षसी शक्तींचा संहार करायला वेगवेगळे अवतार घेतले. गणेश पुराण, मुद्गल पुराण, गणेश अंक इत्यादी ग्रंथांमध्ये गणपतीच्या या अवतारांचे वर्णन वाचायला मिळते. आता माहिती घेऊ गणापतीच्या ८ अवतारांची. . .


लंबोदर
समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूनी जेव्हा मोहिनी रूप घेतले तेव्हा भगवान शंकर तिच्यावर काम - मोहित झाले. त्यांचे वीर्यस्खलन झाले ज्यामधून एका काळ्या रंगाच्या दैत्याची निर्मिती झाली. या राक्षसाचे नाव क्रोधासुर होते. क्रोधासुराने सूर्याची कडक उपासना करून ब्रम्हांड विजयाचे वरदान मागून घेतले. या त्याच्या वरदानामुळे सर्व देव भयभीत झाले. क्रोधासुर युद्ध करायला निघाला. तेव्हा गणपतीने लंबोदर रूप घेऊन त्याला रोखले. त्याला समजावले आणि ही जाणीव करून दिली की तो विश्वातील अजिंक्य योद्धा कधीच होऊ शकत नाही. क्रोधासुराने आपले हे विजयी अभियान स्थगित केले आणि सर्व सोडून पाताळ लोकात निघून गेला.