अष्टविनायक

गणपतीची आठ अतिप्राचीन मंदिरे, जिथे वसले आहेत स्वयंभू गणपती बाप्पा..!!


अष्टविनायक दर्शन

अष्टविनायक म्हणजे "आठ गणपती". या आठ अतिप्राचीन मंदिरांना भगवान गणेशाची शक्तिपीठे देखील म्हटले जाते. ही सर्व मंदिरे महाराष्ट्रात आहेत. ही मंदिरे महाराष्ट्रातील पुण्यापासून २० ते २०० किलोमीटर एवढ्या अंतरात वसलेली आहेत. या मंदिरांना इतिहास आहे. या मंदिरांना पौराणिक महत्त्व आहे. या मंदिरांमध्ये विराजमान असलेल्या गणपतीच्या मूर्ती स्वयंभू आहेत असं मानलं जातं. स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट झालेल्या. म्हणजेच त्या मनुष्य निर्मित नसून नैसर्गिक, आपणहून निर्माण झालेल्या आहेत. अष्टविनायकाची ही आठही मंदिरे अतिशय प्राचीन काळापासूनची आहेत. या सर्व मंदिरांचा विशेष उल्लेख आपल्याला हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ गणेश पुराण आणि मुद्गल पुराण यामध्ये आढळतो. या आठ स्थानांच्या यात्रेला 'अष्टविनायक तीर्थयात्रा' किंवा 'अष्टविनायक दर्शन' म्हणून ओळखण्यात येतं. या पवित्र मूर्ती सापडल्याच्या क्रमानेच ही अष्टविनायक यात्रा देखील केली जाते.

अष्टविनायक दर्शन यात्रेचा शास्त्रोक्त क्रम -

मयुरेश्वर किंवा मोरेश्वर - मोरगाव, पुणे
सिद्धिविनायक - सिद्धटेक, कर्जत, अहमदनगर
बल्लाळेश्वर - पाली, जिल्हा रायगड
वरदविनायक - महाड
चिंतामणी - थेऊर गाव, पुणे
गिरिजात्मज - लेण्याद्री, पुणे
विघ्नेश्वर - ओझर
महागणपती - रांजणगाव