सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 115

वसंता : हिंदु धर्माची लाज कोण राखणार ?

गर्दीतून एकजण पुढे येतों. तो स्वयसेंवक दिसतो .

पोलीस : बोला, आहे कोणी तयार ?

स्वयंसेवक : आणा तें मूल. तें घ्यावयास मी तयार आहें

वसंता एकदम 'हिंदु धर्मकी जय' म्हणतो. परंतु तो अदृश्य असल्यामुळे कोणास दिसत नाही. लोकांना वाटतें कीं, आकाशवाणी झाली. लोक वर पाहूं लागतात. मंदिराच्या पोळीवरून पुन्हा 'हिंदु धर्मकी जय,' 'पतितपावन सीता रामकी जय' असा जयघोष ऐकूं येतो. रामाचा आदेश आहे असें लोकांना वाटते. सर्वांचीं हृदयें येतात. ''हिंदु धर्मकी जय,'' अशा गर्जनांनी आवार दुमदुमून जाते. प्रत्येकाच्या कंठातून तो जयध्वनी बाहेर पडतो!

पोलीस : तुम्ही कोण आहांत ?

स्वंयसेवक : मी एक आश्रमांतील स्वयंसेवक आहें.

पोलीस : कोठें आहे आश्रम ?

स्वयंसेवक : बागलाणातील टेंभें गावी.

पोलीस : तुम्ही ह्या मुलाची सर्व व्यवस्था कराल ?

स्वंयसेवक
: हो.

पोलीस : हा आश्रम केव्हां स्थापन झाला ?

स्वयंसेवक : हा गेल्या वर्षी स्थापन झाला.

पोलीस : तुम्ही गांधीचे लोक दिसता ?

स्वयंसेवक : हो

पोलीस : तरीच पुढे आलेत!