बुद्ध, धर्म आणि संघ

बुद्ध व बौद्धधर्म यावर धर्मानंद कोसंबी यांचा निबंध


*संघ 28

सीहलदीपं पन आभथाथ वसिना महामहिन्देन।
ठपिता सीहलभासाय दीपवासिनमत्थाय।।
अपनेत्वान ततोहं सीहलभासं नमोरमं भासं।।
तन्तिनयानुच्छविकं आरोपेन्तो विगतदोसं।।

(ही अट्ठकथा) महामहिन्दानें सिंहलद्वीपास आणली, आणि (या) द्वीपवासी जनांच्या हितासाठीं सिंहलभाषेंत लिहून ठेवली. ती सिंहलभाषेंतून काढून मनोरम आणि शास्त्रास अनुकूल अशा निर्दोष पालिभाषेंत ठेवतों (ठेवणारा मी).
या अट्ठकथांचीं नांवें येणें प्रमाणे:-

१ दीघनिकाय अट्ठकथा – सुमंगलविलासिनी.
२ मज्झिमनिकाय अट्ठकथा - पपंचसूदनी.
३ संयुत्तनिकाय अट्ठकथा- सारत्थप्पकासिनी.
४ अंगुत्तरनिकाय अट्ठकथा -  मनोरथपूरणी.
५ विनय अट्टकथा- समंतपासादिका.
६ धम्मसंगणि अट्टकथा- अट्ठसालिनी.
७ विभंग अट्ठकथा- संमोहविनोदनी.
८ धातुकथा, पुग्गलपञ्ञति, कथावत्थु, यमक व पठ्ठाण या पांच प्रकरणांची अट्ठकथा- पंचप्पकरणअट्ठकथा, खुद्दकनिकायांतील प्रकरणांवर निरनिराळ्या आचार्यांनी अट्ठकथा लिहिल्या आहेत.

सुत्तपिटकांत विशेषत: बुद्ध आणि बुद्धाचे प्रमुख शिष्य यांच्या उपदेशाचा संग्रह केला आहे; विनयपिटकांत भिक्षूंनीं पाळण्यांच्या नियमांचा संग्रह केला आहे; आणि अभिधम्मपिटकांत बौद्ध तत्त्वज्ञानांचा विस्ताराने विचार केला आहे.