बुद्ध, धर्म आणि संघ

बुद्ध व बौद्धधर्म यावर धर्मानंद कोसंबी यांचा निबंध


*संघ 5

भिक्षु - तूं ऋणमुक्त आहेस ना?

उ.- होय महाराज.

भिक्षु - तूं राजाचा योद्धा नाहींस ना?

.- होय महाराज (मी राजाचा योद्धा नाहीं.)

भिक्षु - आईबापांची तुला परवानगी आहे ना?

.- होय महाराज.

भिक्षु
- तुझ्या वयाला वीस वर्षे पुरी झालीं आहेत ना?

.- होय महाराज.

भिक्षु
- तुला लागणारें पात्र आणि चीवरें तुझ्या जवळ आहेत ना?

.- होय महाराज.

भिक्षु
- तुझें नांव काय?

उ.
- अमुक.

भिक्षु - तुझा उपाध्याय कोण?

उ.- अमुक.

या प्रश्नांची वर सांगितल्याप्रमाणें यथायोग्य उत्तरें दिल्यावर तो संघाला त्रिवार विनंती करितो कीं, हा उमेदवार उपसंपदेला अंतराय करणार्या गोष्टींपासून मोकळा आहे, याला लागणारें पात्र व चीवरें याजपाशीं आहेत. आता या उपसंपदेची याचना करीत आहे. याचा उपाध्याय अमुक. जर संघाला योग्य वाटत असेल, तर संघानें यास उपसंपदा द्यावी. ज्याला योग्य वाटत असेल त्यानें मुकाटय़ानें रहावें, ज्याला योग्य वाटत नसेल त्यानें बोलावें. सगळा संघ मुकाटय़ानें राहिला म्हणजे तो म्हणतो की:- संघाला ही गोष्ट मान्य आहे म्हणून संघ मुकाटय़ानें आहे, असें मी समजतो.’’

नंतर त्या उमेदवारास आपली छाया पावलांनी मोजावयास सांगतात; १ (१ पूर्वी आपली छाया मोजून वेळ समजत असत.) त्याला ऋतु, मास वगैरे सांगतात; आणि पुढील चार आधार (अवलंबून राहण्यासारख्या गोष्टी) सांगण्यांत येतात.

भिक्षु
- भिक्षान्नावर अवलंबून राहण्यासाठीं तुझा हा संन्यास; म्हणून यावज्जीव भिक्षान्नावर अवलंबून राहण्याचा तूं प्रयत्न केला पाहिजे. संघदानादिक प्रसंगीं मिळालेलें अन्न विशेष लाभ, असें तूं समजावें.

उ.
- होय महाराज.

भि
.- मार्गात पडलेल्या चिंध्या गोळा करून केलेल्या चीवरांवर अवलंबून राहण्यासाठी तुझा हा संन्यास;म्हणून यावज्जीव तशा चीवरांवर अवलंबून राहण्याचा तूं प्रयत्न केला पाहिजे. क्षौमादि वस्त्रांची चीवरें (कोणी गृहस्थांकडून) मिळालीं, तर तो विशेष लाभ असें तूं समजावें.

उ.
- होय महाराज.

भि.- तरुतलवासावर अवलंबून राहण्यासाठीं हा तुझा संन्यास; म्हणून यावज्जीव झाडाखालीं राहण्याचा तूं प्रयत्न केला पाहिजे. विहारादिक (राहण्यासाठीं) मिळाले, तर तो विशेष लाभ, असें तूं समजावें.

.- होय महाराज.

भि. - गोमूत्राच्या औषधावर अवलंबून राहण्यासाठी हा तुझा संन्यास; म्हणून यावज्जीव गोमूत्राच्या औषधावर निर्वाह करण्याचा तूं प्रयत्न केला पाहिजे. घृतनवनीतादिक (औषधोपयोगी पदार्थ) मिळाले, तर तो विशेष लाभ, असें तूं समजावें.

उ.- होय महाराज.

तद्नंतर चार अकार्य गोष्टी सांगण्यांत येतात.


भि
.- संघांत प्रवेश केलेल्या भिक्षूनें मैथुनव्यवहार करतां कामा नये.. जो भिक्षु मैथुनव्यवहार करील, तो अश्रमण होईल, अशाक्यपुत्रीय होईल. जसा डोकें कापलेला मनुष्य नुसत्या धडानें जगूं शकत नाहीं, तसा मैथुनव्यवहार केला असतां भिक्षु अश्रमण होतो, अशाक्यपुत्रीय होतो; म्हणून ही गोष्ट तूं यावज्जीव करतां कामा नये.