भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 96

“हे ब्राह्मणा, हे तीन अग्नि त्याग करण्याला, परिवर्जनाला योग्य आहेत त्यांचे सेवन करू नये ते कोणते? रामाग्नि, द्वेषाग्नि आणि मोहाग्नि जो मनुष्य कामाभिभूत होतो, तो कायावाचामने कुकर्म आचरतो आणि त्यामुळे मरणोत्तर दुर्गतीला जातो. त्याचप्रमाणे द्वेषाने आणि मोहाने अभिभूत झालेला मनुष्य देखील कायवाचामने कुकर्मे आचरून दुर्गतीला जातो, म्हणून हे तीन अग्नि त्याग करण्याला, परिवर्जनाला योग्य आहेत, त्याचे सेवन करू नये.

“हे ब्राह्मणा, या तीन अग्नीचा सत्कार करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची पूजा आणि चांगल्या रीतीने, सुखाने परिचर्या करावी ते अग्नि कोणते? आहवनीयाग्नि (आहुनेय्याग्गि), गार्हपतयाग्नि (गहृपतग्गि),  दिक्षणाग्नि (दक्खिणेय्यग्गि)* आईबापे आहवनीयाग्नि समजावा आणि त्यांची मोठ्या सत्काराने पूजा करावी. बायकामुले, दास कर्मकार मार्हपत्यग्नि आहेत, असे समजावे, व त्यांची आदरपूर्वक पूजा करावी. श्रमणब्राह्मण दक्षिणाग्नि समजावा आणि त्याची सत्कारपर्वक पूजा करावी. हे ब्राह्मणा, हा लाकडाचा अग्नि कधी पेटवावा लागतो, कधी त्याची उपेक्षा करावी लागते व कधी विझवावा लागतो.”

हे भगवंताचे भाषण ऐकून उदगतशरीर ब्राह्मण त्याचा उपासक झाला आणि म्हणाला, “भो गोतम, पाचशे बैल, पाचशे मोहरे, पाचशे कालवडी, पाचशे बकरे व पाचशे मेंढे या सर्व प्राण्यांना मी यूपापासून मोकळे करतो. त्यांना जीवदान देतो. ताजे गवत खाऊन आणि थंड पाणी पिऊन ते शीतल छायेत आनंदाने राहोत.”

यज्ञात तपश्चर्येचे मिश्रण

बुद्धसमकालीन यज्ञयागात ब्राह्मणांनी तपश्चर्येचे मिक्षण केले होते. वैदिक मुनिजंगलात राहून तपश्चर्या करू लागले, तरी सवडीप्रमाणे मधून मधून लहान मोठा यज्ञ करीतच. याची एक दोन उदाहरणे तिसऱया प्रकरणात दिली आहेतच* याशिवाय याज्ञवल्क्याचे उदाहरण घ्या. याज्ञवलक्य मोठा तपस्वी आणि ब्रह्मिष्ठ समजला जात असे. असे असता त्याने जनक राज्याच्या यज्ञात भाग घेतला. आणि शेवटी एक हजार गाईची दहा हजर सुवर्णपादंसह दक्षिणा स्वीकारली.

परंतु यज्ञ आणि तपश्चर्या यांचे मिश्रण दुप्पट दु:खकारक आहे, असे बुद्ध भगवंताचे म्हणणे होते. कन्दरक सुत्ता  भगवंताने चार प्रकारची माणसे वर्णिली आहेत, ती अशी- (१) आत्मन्तर पण परन्तप नव्हे, (२) परन्तप पण आत्मन्तप नव्हे, (३) आत्मन्तप आणि परन्तप (४) आत्मन्तपही नवहे आणि परन्तपही नव्हे.

ह्या चारात पहिला कडक तपश्चर्या करणारा तपस्वी होय. तो स्वत:ला ताप देतो, पण पराला ताप देत नाही. दुसरा खाटीक पारधी वगैरे. तो दुसर्‍या प्राण्याला ताप देतो पण स्वत:ल ताप देत नाही. तिसरा यज्ञयाग करणारा. तो स्वत:लाही ताप देतो आणि इतर प्राण्यांनाही ताप देतो. चवथा तथागताचा (बुद्धाचा) श्रावक. तो आपणाला किंवा पराला ताप देत नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*हे तीन अग्नि ब्राह्मणी ग्रंथात प्रसिद्ध आहेत. ‘दक्षिणाग्निहिंपत्याहवनी त्रयोग्नय:।’ (अमरकोश) यांची परिचर्या कशी करावी व तिचे फळ काय इत्यादि माहिती गुह्मसूचादि ग्रंथात सापडते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------