नवसाला पावणारे गणपती- भाग ५

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्रीगणेश देवस्थान गणपती पेठ सांगली

सांगलीचे संस्थानिक पटवर्धन व महाराष्ट्रातले बहुतेक सर्व पटवर्धन घराण्यांचे हे कुलदैवत आहे.

अप्पासाहेब पटवर्धन यांनी मंदिर उभारण्यास सुरुवात केली होती तर चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कारकिर्दीत हे मंदिर पूर्ण झाले.

या मंदिराची उत्सव मूर्ती संगमरवराची असून रिद्धी सिद्धी सहित आहे  

दिशा साधनाचा साधन यंत्राचा अवलंब केल्याने श्रींचे दर्शन हे थेट गणपती बाजारपेठेतून देखील घेता येते.  

वव महाराष्ट्रातील इतर पटवर्धन घराण्यांचे हे कुलदैवत आहे हे मंदिर सर्वधर्मीयांसाठी खुले आहे आप्पासाहेब पटवर्धन यांनी या मंदिराची उभारणी करण्यास सुरूवात केली,

तर चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्याकडे केली.

विशिष्ट दिवशी पूर्वाभिमुख श्रींवर सूर्यकिरणे पडतात. आप्पासाहेब पटवर्धन हे पेशवाईतील खंदे सेनानी होते.

गणपतीची स्थापना १८४३ साली केली गेली.

मुंबई पुण्याहून रेल्वेने किंवा बसने सांगलीला येता येते. तिथून पुढे रिक्षाने गणपती पेठेत जाता येते.