नवसाला पावणारे गणपती- भाग ५

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


पंतांचा कोटाचा गणपती सोमवार पेठ कराड

औंधच्या संस्थानिकांनी दोन अडीच एकराच्या टेकडीवजा वास्तुवर एक दगडी कोट बांधला होता.

कराड म्हणजे कृष्णा आणि कोयना च्या संगमाचे ठिकाण आहे.

कराड मधल्या सोमवार पेठेच्या एका पुरातन वटवृक्षाखाली हे गणपतीचे मंदिर आहे वास्तविक पूर्वी कोर्टाच्या बाहेरच्या अंगाला एक उकिरडा होता

तो साफ करीत असताना गणेशाची मूर्ती सापडली  म्हणून त्याला पंताचा कोटाचा गणपती असे नाव आहे

पुरातन वटवृक्षाखाली चे हे मंदिर अत्यंत छोट्या जागी बांधले गेले आहे  

या मंदिराला प्रदक्षिणा घालणे कितपत जेमतेम मार्ग आहे

या गाणं या गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची असून हे एक जागृत देवस्थान आहे

कराड एस्टी स्टॅन्डवरून रिक्षाने जेमतेम पाच मिनिटांत  येथे पोहोचता येते या मंदिराची स्थापना १६५९ साली झाली.