नवसाला पावणारे गणपती- भाग ५

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री गजानन इंचेनाळ गडहिंग्लज

या मंदिराचे बांधकाम सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचे आहे.

या मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन आहे आणि १९०७-०९ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता.

या मंदिरातली गणेशमूर्ती दगडी धीरगंभीर आणि चतुर्भुज आहे.

या मंदिराच्या भोवताली नवरात्रोत्सव हा विशेष उत्सव असतो कोल्हापूर गडहिंग्लज फाट्यावर तीन किलोमीटरवर इंचेनाळ हे गाव आहे.

आंबोली-रामतीर्थ-गडहिंग्लज या मार्गावरूनही इंचेनाळला जाता येते अंगारकी संकष्टी ला गडहिंग्लजहून विशेष एस.टी श्री गजानन मंदिरासाठी निघतात.

मौजे इथेनॉलचे ग्रामदैवत श्री गजानन हे आहे १९९२ ला करवीर पीठाच्या शंकराचार्य यांच्या हस्ते मंदिरावर कळस कळस चढवण्यात आला होता.

ही शिवकालीन  पुत्रप्राप्तीसाठी अनुकूल असल्याचे भक्तांची श्रद्धा आहे.