नवसाला पावणारे गणपती- भाग ५

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


खडीचा गणपती पंचगांव कोल्हापूर

डाॅ रत्नाप्पा कुंभार यांचा गणपती खडीचा गणपती म्हणून प्रसिध्द आहे.

कोल्हापूरच्या शाहू चौकातून मोरेवाडी किंवा कुंभार नगर अशी बस निघते.इथे मोरेवाडी बसथांब्यावर पांचगांवचा खडीचा गणपती दिसतो.

१९८५ साली या खडीच्या गणपतीची स्थापना करवीरपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते झाली.

दगडात मिळालेली, नवसाला पावणारी आणि तिळातिळाने वाढणारी असे वैशिष्टय़ या खडीच्या गणपतीचे आहे.