नवसाला पावणारे गणपती- भाग ५

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


बिनखांबी गणेश मंदिर कोल्हापूर

कोल्हापूर शहरात अंबाबाई देवळाच्या बाहेर ऐन गजबजलेल्या ठिकाणी मधोमध एकही खाम नसलेले हे गणेश मंदिर आहे.

मूळचे संगमेश्वरचे असल्यास असलेले ज्योतिषी जोशीराव या मंदिराच्या परिसरातच राहत होते

ज्योतिषी सल्ल्यासाठी जोशी रावांकडे अनेक लोकांच्या रांगा लागत होत्या. आणि साहजिकच जोतिरावांचा गणपती म्हणून या बिनखांबी गणेशाला प्रसिद्धी मिळाली.

बापूराव वाईकर यांच्या विहिरीतला गाळ उपसला जात असताना एक छोटीशी गणेशमूर्ती मिळाली.

कोल्हापूरचे छत्रपती व गणेशभक्तांच्या मदतीने १८८२ साली या गणेशमूर्तीसाठी मंदिर बांधले गेले.

तोच हा बिनखांबी गणेश