नवसाला पावणारे गणपती- भाग ५

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


साक्षी गणेश शेळके पूल कोल्हापूर

साक्षी गणेशाच्या गणेशस्थानाच्या संबंध ऑगस्ट मुलींशी जोडला जातो त्यांच्या करवीर भेटीची कथा म्हणजे हे गणेशस्थान असे समजले जाते

करवीर नगरात हे साक्षात अंबा भवानीचे जागृत स्थान आहे.

 अंबा भवानी च्या जागृत स्थानाचा घाटी दरवाजावरचा अंगास असलेला मूक श्रीगणेश आणि शहरातील शेळके पुलानजीकच्या असलेला साक्षी गणेश हेच होय.

अगस्ती मुनींची पत्नी ही विदर्भीय राजकन्या होती जिचं नाव लोपमुद्रा होतं

ते तिच्यासमवेत दक्षिणेला यात्रा करायला निघाले असताना त्यांनी ओढ्यावर श्रीगणेशाची साक्षी ठेवली तोच हा साक्षी गणेश. अगस्ती ऋषींनी ज्या गणेशाचे दर्शन घेऊन आपले दक्षिण यात्रा पूर्ण केली

तो म्हणजे मोक्षी श्रीगणेश. प्रसिद्ध ज्योतिषी जोशी रा यांच्या घराण्यातील थोर पुरुषांनी देवालयाचे बांधणी याच्या भोवताली केली.