नवसाला पावणारे गणपती- भाग ३

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्रीगणेश पंचायतन तासगाव जि सांगली

पेशव्यांच्या कारकिर्दीतील पराक्रमी सेनानी व तासगाव संस्थानाचे संस्थापक परशुरामभाऊ पटवर्धन हे गणेशाचे मोठे उपासक होते.

मोहिमेवर जाण्यापूर्वी ते नेहमी पश्चिमाभिमुख गणपतीपुळ्याच्या दर्शन घेऊन मगच पुढे कूच करत असत.

श्रींच्या दृष्टांतानुसार तासगावला त्यांनी या गणेश मंदिराची स्थापना केली

दक्षिणी पध्दतीने गोपुरासहित त्यांनी १७७० ते १७७९ मध्ये मंदिर बांधले व वर्षांसन लावून दिले.

मंदिराभोवती दहा फूट लांबीचा व चार फूट रुंदीचा तट उभारलेला आहे

प्रांगणात तीन मजल्याच्या दोन मोठ्या दीपमाळा आहेत