नवसाला पावणारे गणपती- भाग ३

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री गारेचा गणपती चिमणपुरा सातारा

सातारा शहरातील चिमणपुरा वस्तीत हे गणेशाचे ठिकाण आहे

सुमारे तीनशे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी या गणेश मंदिराची स्थापना झाली होती

पूर्वी सोमवार पेठेतील रखमाईनी तेली यांच्या घरी  असलेली गणेशमूर्ती श्रींच्या दृष्टांतानुसार ब्रह्मवृंदाकडे सुपूर्द करण्यात आली होती.

वैशाख शुद्ध तृतीयेस तिची प्रतिष्ठापना केली गेली छत्रपती शाहू महाराजांचे एक संकट या गणपतीने निवारले असल्याची चर्चा आहे

त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी या मंदिराला अनेक प्रकारे मदत केली होती.

अश्वत्थ वृक्षाखाली हे मंदिर होते १९९२ ला या मंदिराचा जीर्णोद्धार झाला

मूर्ती गारांची आहे त्यामुळे तिला गारेचा गणपती असे नाव पडले ही मूर्ती उजव्या सोंडेची असून रिद्धी सिद्धी सोबतची आहे.

या मंदिरात देवाचा उत्सव अक्षय्य तृतीया केला जातो. माघ द्वितीया ते नवमीपर्यंत हा उत्सव चालतो. मनोकामना पूर्ण करणारे हे श्रद्धास्थान मानले जाते.