नवसाला पावणारे गणपती- भाग ३

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


धरणीधर किंवा प्रवाळ गणेश, पद्मालय, जळगाव

कृतवीर्य पुत्र कार्तवीर्य म्हणजेच सहस्राभूज व शेष या दोघांनी एकाच ठिकाणी स्थापन केलेल्या दोन गणेशमूर्ती या मंदिरात आहेत.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच बैठकीवर दोन गणेशमूर्ती आहेत

त्यातली डावीकडची मूर्ती उजव्या सोंडेची असून उजवीकडची मूर्ती डाव्या सोंडेची आहे.

या दोन्ही स्वयंभू प्रवाळयुक्त गणेशमूर्ती आहेत. सभामंडपातच चार फूट उंचीचा पाषाणातील मूषक आहे.

या मूषकाच्या हाती मोदकही आहे या उंदराला चौदा बोटे आहेत. रेल्वेने मुंबई-एरंडोल मार्गावर म्हसवड स्टेशन आहे.

या स्टेशनवरून बसने पद्मालयाला जाता येते. मुंबई एरंडोल हा सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास आहे.