नवसाला पावणारे गणपती- भाग ३

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


भालचंद्र गणेश, गंगा मसले,मागलगाव,बीड

गणपतीने चंद्राला शाप दिला होता ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे.

आपल्या शांत मुक्तीसाठी चंद्राने गणेशाची आराधना केली हाेती. हे चंद्राच्या तपाचे हे स्थान आहे.

चंद्राने येथे गणेशाची स्थापना केली. गणेशाने चंद्रास आपल्या मस्तकावर ह्या ठिकाणी धारण केले. हेच ते पवित्र ठिकाण गंगामसले.

महत्त्वाच्या एकवीस गणेश मंदिरांपैकी हे भालचंद्र गणेश एक महत्त्वाचे स्थान आहे. या गणेश क्षेत्रास पूर्वी भालचंद्र पूर किंवा सिद्धाश्रम असे म्हटले जायचे.

हे गणेशस्थान गोदावरी नदीच्या काठी आहे. मुंबईहून परभणीचा रेल्वे प्रवास ५५२ किलोमीटर इतका आहे.

यादरम्यान सेलू नावाचे रेल्वे स्थानक लागते तिथून २४ किलोमीटर अंतरावर गंगामसले हे गाव आहे.

औरंगाबादवरून गंगामसले बसने साडेतीन तासांचा प्रवास आहे.

त्यादरम्यान औरंगाबाद ते जेवराई ते माजलगाव आणि माजलगाव ते गंगामसले अशी बस जाते.