नवसाला पावणारे गणपती- भाग १

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री दशभूज सिद्धी लक्ष्मीगणेश जांभूळपाडा रायगड

रायगड जिल्ह्यातील खोपोली पाली याचा रस खोपोली पाली रस्त्यावर पाताळगंगा नदीकाठी वसलेले हे श्री दशभूज सिद्धी लक्ष्मी गणेश मंदिर आहे.

जांभूळपाडा या गावात पूर्वीपासूनच हे मंदिर आहे. प्रसिद्ध महड-पाली या अष्टविनायकांच्या मध्ये हे गाव आहे.

१९८९ या साली येथे महाप्रलय झाला व मंदिर आणि गाव उद्ध्वस्त झाले पण गणेशाची मूर्ती सुरक्षित राहीली.

ग्रामस्थांनी नंतर मंदिराची डागडुजी केली.

भोर संस्थानातील जांभूळपाडा या गावाची मूल मूळ मालकी खरे म्हणजेच दीक्षित यांची होती. त्यांच्या घरातही या देवाची प्रतिकृती आहे.  

या मंदिरातील मूर्ती भव्य पुरातन आणि दशभुजाधारी आहे.