नवसाला पावणारे गणपती- भाग १

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री शनी गणपती पैठण औरंगाबाद

विघ्नकर्ता असलेले शनिमहाराज आणि विघ्नहर्ता असलेला गणपती यांचे एकत्र एकमेव ठिकाण म्हणजे पैठण.

हे गणेशाचे मंदिर संत एकनाथ महाराजांच्या वाड्याजवळ आहे.

या मंदिरात एकाच दगडी चौथऱ्यावर गणपतीची व शनिची मूर्ती आहे.

आधी गणेशाची पूजा होते व नंतर शनीदेवाला अभिषेक केला जातो. पैठण येथील हे अत्यंत जागृत असे देवस्थान आहे.

औरंगाबाद शहरापासून पैठण बसने दीड तासाच्या अंतरावर आहे.