महाभारत सत्य की मिथ्य?

महाभारताचा हिंदू धर्माशी सखोल संबंध आहे आणि आधुनिक हिंदूंवर आणि त्यांच्या सांस्कृतिक परंपरेवर त्याचा प्रचंड प्रभाव आहे. भारतातील बरेच लोक महाभारताला वास्तविक घटित घटनांची एक मालिका समजतात. काही भारतीय या अगम्य महाकाव्यातून घडलेल्या घटनांची इतिहासात नोंद केली आहे. हे महाकाव्य एक ऐतिहासिक लेख समजले जाते. महाभारत हे सत्य आहे की दंतकथा हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहिला आहे. आपण याची पाळेमुळे खोदुन काढण्याचा, शोधण्याचा प्रयत्न केला की जाणवते की महाभारत प्राचीन भारतीय इतिहासाला लाभलेली समृद्ध आणि वास्तवदर्शी माहिती आहे. महाभारताच्या सत्यता आणि दंतकथा असण्यावर लिहिलेले लेख वाचल्यास प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे अश्या अनेक घटना आपल्या डोळ्यासमोर येतील. त्या घटनांचा अभ्यास करत असताना आपल्याला बहुधा मतांची एक बाजू मिळेल अशीही समजेल ज्यालेखी महाभारतातील वास्तव ही वस्तुस्थिती नाही. या चर्चेअंती इतके तर सत्य आपल्याला कळेल की महाभारत हा भारताचा एक समृद्ध आणि ज्ञानाने ओतप्रोत भरलेला भारतीय इतिहास आहे यात शंका नाही.


राजवंशाची नोंद

सुरुवातीच्या काही ग्रंथांमध्ये तसेच आदिपर्वामध्ये, महाभारताचे काही अध्याय हे भारत-राजवंशाच्या नोंदी विषयीच्या इतर अठरा पुस्तकांपैकी पहिले पुस्तक आहे. यामध्ये भारत राजवंशाचे वंशज कालक्रमानुसार नोंदवले गेले आहेत. राजा मनुपासून सुरू झालेल्या या वंशाबद्दल शिवाय त्याहून अधिक, काही राजे व त्यांच्या राजवंशांचा तपशीलवार उल्लेख यात करण्यात आला आहे.

एखाद्या काल्पनिक कथेसाठी इतके राजे व त्यांचे वंश या सगळ्याची केवळ कल्पनाच करणे हे अकलनीय आहे. केवळ एका कथेसाठी इतकी पात्र लिहिणे जे आजच्या लेखकाला पटत नाही. आजच्या काळात आपण जे.के.रॉलिंगच्या हॅरी पॉटरला जर खरे मानु शकतो तर महाभारतात त्यावेळचे अनेक कालानुरुप दाखले आहेत. त्यावेळच्या राजा महाराजांचे जीवन व आजुबाजुची समकालीन उदाहरणे यांची ही केवळ कल्पना करणे हे असामान्य वाटते. आपण आत्तापर्यंत वाचलेल्या काही काल्पनिक कथांमध्ये कोणत्याही कार्यात्मक कथा बांधणीसाठी फक्त पाच सहाच राजे त्यांचे वंश पुरेसे असतात. तिथे महाभारतात संपुर्ण जगभरातील राजे व त्यांचे वंश याचा उल्लेख आहे.

त्याकाळच्या विविध जागांचा उल्लेख आहे ज्या जागा केवळ भारतात नाही तर भारता बाहेरच्या देशात आहेत. हे देश भारतीय उपखंडाचा एक भाग होते. त्याकाळी ह्या जागा अखंड भारतात होत्या. उदा. गांधारीचा देश गांधार देश म्हणजे साधारण आजचा अफगाणिस्ताना जवळचा प्रभाग.

महाभारताचे आणि कुरुक्षेत्राचे समर्थन करणार्‍या लोकांचा विचार केल्यास आपल्याला असे जाणवते की या सत्यात घडलेल्या ऐतिहासिक घटना आहेत. या काल्पनिक घटना असत्या आणि लेखकाचा हेतू एक कविता किंवा काल्पनिक कथा लिहिण्याचा मनसुबा असता तर लेखकाने त्याचा कुठेतरी उल्लेख केला असता.