साईबाबांची उपासना

साईबाबांची उपासना आठवड्याच्या कोणत्याही दिवशी केली जाऊ शकते. परंतु गुरुवार हा गुरुचा वार आहे, यामुळे गुरुवारी साईबाबांची विशेष उपासना केली जाते. साई भक्ती आणि नामस्मरणामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात. गुरूवारी साईबाबा यांची पूजा आणि स्मरण करणे शुभ मानले जाते.


श्रद्धा, सबूरी, एकता

प्रत्येक साईभक्ताने बाबांनी सांगितलेल्या पुढील तीन गोष्टी सदैव स्मरणात ठेवल्या पाहिजेत.

1. श्रद्धा.
साईबाबांचे हे सूत्र केवळ धार्मिक अर्थानेच नाही तर व्यावहारिक अर्थानेही महत्त्वाचे आहे. जीवनात तुम्ही कोणतेही काम करताना श्रद्धेने आणि समर्पित वृत्तीने करा. त्या कार्याप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा आणि त्यागची भावना ठेवा.

2. सबूरी.
जीवनात सुखी होण्यासाठीचा श्रेष्ठ उपाय आहे सबूरी. संतोष, धैर्य आणि संयम या गुणांमुळे जीवनात स्थायी आनंदाची प्राप्ती होते. असंतोष किंवा असंयम, कलह, संताप यामुळे जीवन सुखी होणे शक्यच नाही.

3. एकता.
साई बाबांनी सांगितलेल्या या सूत्रानुसार मानवता म्हणजेच धर्म होय. सर्वात महान धर्म म्हणजे मानवता. ईश्वर हा अनेक रुपांतून व्यक्त होतो, हा हिंदू धर्मातील मूलभूत सिद्धांत साई बाबांनी आणखी सोप्या भाषेत या जगाला सांगितला आहे. माझाच धर्म खरा या संकुचित विचारापासून दूर राहिले पाहिजे. इतर धर्मांचाही आदर केला पाहिजे. विश्वास, प्रेम, परोपकार, दया, त्याग ही मूल्ये जपली पाहिजेत. यातच धर्म आहे. 'सबका मालिक एक' या मंत्राने साईबाबांनी सगळ्यांना एक केले.