श्री शनिदेव

श्री शनिदेव


श्री शनिदेव आपल्याला का सतावतो?

 शनी शिंगणापूर येथे श्री शनिदेवाचे जागृत दैवत आहे. इथे शनि अमावस्या , शनि जयंती विशेषतः शनि पालट या दिवशी भाविकांची मोठी यात्रा भरते. साडेसातीमुळे त्रस्त  झालेले अनेक भक्त येथे दरमहा अमावस्येला जाऊन त्रासाची तीव्रता कमी करतात. तसेच शनिने विक्रम राजा वर प्रसन्न होवून दिलेले " शनिमाहात्म्य" हे एक शनि चे महिमा सांगणारे श्रेष्ठ काव्य होय. गुजरातमध्ये या महात्म्यास मोठे महत्व आहे.

प्रस्तुत कलियुग आहे. कलियुग पाप - पुण्याने भरलेले आहे. आजच्या कठीण काळात प्रत्येक मनुष्य इंटरनेट , दूरदर्शन, विमान, रेल्वे, कॉम्पुटर इत्यादी भौतिक सुख साधनांच्या अभिलाषामध्ये तेजागतीने प्रत्येक क्षणी पळत आहे. लक्षात असू द्या तेवढ्याच गतीने सुख शांती आपल्यापापासून दूर जात आहे. हया संसाराच्या पळापळीत अनेक लोक म्हणतात की शनि आम्हाला त्रास देतो , पिडा देतो. पण का ? कुणीच असा विचार का करीत नाही की श्री शनिदेव मुद्दाम त्रास देतो का ? कां त्याच्याजवळ दुसरी काही कामे नाहीत का? त्यांचे सर्वांशी वैर आहे कां आपला शत्रु आहे कां ? पण माझे प्रामाणिक मत आहे की शनि आपला शत्रु नसून तो मित्रच आहे.

राष्ट्रभाषा हिन्दीत शनि बद्दल असे मत आहे की,

" शनि राखै संसार में , हार प्राणी की खैर ,
न काहू से दोस्ती. न काहू से बैर || "

श्री शनिदेव लोकांना सजा देत नाही, त्यापेक्षा अधिक लोक त्याच्या दंडाच्या भितीनेच घाबरतात. लोक मृत्यू ने कमी , मृत्यूच्या भितीनेच अधिक मरतात. वास्तविक पाहता श्री शनिदेव लवकर प्रसन्न होणारा देव आहे. श्री शनीदेवा वरील आपली भक्ती समस्त शारीरिक , कौंटुबिक , सामाजिक मानसिक , आर्थिक , प्रशासनिक अडचणींची पीडा समाप्त करते. लोकांनी श्री शनिदेवचे नाव घेवून अनेकांना घाबरवले परंतु त्या वरील उपाय सांगून, मदत करण्याचे धाडस कुणी केले नाही.