श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


ध्याईं मनीं तूं दत्तगुरु ...

ध्याईं मनीं तूं दत्तगुरु ॥ध्रु०॥

काषायांवर चरणीं पादुका, जटाजूट शिरीं ऋषिकुमरु ॥ध्याई०॥१॥

माला कमंडलु शूल डमरु करीं, शंख चक्र शोभे अमरु ॥ध्याई०॥२॥

पतितपावन तो नारायण, श्वान सुरभिसम कल्पतरु ॥ध्याई०॥३॥

स्मृर्तृगामी कलितार दयाधन, भस्म, विभूषण ’रङग’ वरु ॥ध्याई०॥४॥