गजानन महाराज आरती

गजानन महाराज आरती, बावन्नी, अष्टक, स्तोत्र, श्लोक


|| आरती ||

आरती सद्गुरू नाथा ।
अवलीया समर्था ।
आरती ओवाळीतो ।
मनोभावे मी आता ।
आरती सद्गुरू नाथा ।।धृ।।

दिधले निजभक्ता ।
भावे इच्छीत फल त्वा,
पाजुनि ज्ञानामृता ।
उध्दरिले समर्था ।
आरती सद्गुरू नाथा ।।१।।

कविजन गुण गाता ।
थकियले समर्था ।
अघटित ऐसी लिला ।
मति धजि ही न आता ।
आरती सद्गुरू नाथा ।।२।।

विनंती भगवंता ।
तारी रामात्मज आता ।
आरती पूर्ण करितो ।
शरणागत बलवंता।
आरती सद्गुरू नाथा ।।३।।