गणेश पूजा विधी 2

खाली दिलेली गणेश पूजा पूर्ण करण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ लागतो. या विधीद्वारे सुलभ मराठीत गणेश प्रतिष्ठापना करू शकतात. पूजा करण्यासाठी विधी व मंत्रांचा भावार्थ मराठीत दिला आहे.


नैवेद्य दाखवा

विधी: श्री गणेशाला मोदक सर्वांत जास्त आवडतात. विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळे त्यामध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावे.

मंत्र: 'हे देवा! दही, दूध, तूपापासून तयार केलेले खाद्यपदार्थ नैवद्याच्या रूपात अर्पण करतो. आपण त्याचा स्वीकार करावा.' 'हे देवा! आपण हे नैवद्य ग्रहण करा आणि आपल्या प्रति माझ्या मनात असलेल्या भक्तीचे सार्थक करा. मला परलोकात शांती मिळू दे.' ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून नैवद्याच्या रूपात मोदक व फळे अर्पण करा. हस्तप्रक्षालनासाठी जल अर्पित करत आहे.
(पाणी खाली सोडा)

दक्षिणा किंवा नारळ (श्रीफळ)
विधी: एक श्रीफळ किंवा रोख दक्षिणा गणेशाला दान केली जाते. (खालील वाक्य म्हणून दक्षिणा व श्रीफळ अर्पण करा) ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून श्रीफळ व दक्षिणा अर्पण करतो.