श्रीगणेशाची सहस्त्र नामे

श्रीगणेशाच्या सहस्त्रनामांचे मराठी अर्थ.


श्लोक १८१ ते १८४

समस्त-कलह-ध्वंसि दग्ध-बीज-प्ररोहणम्‌ ।
दु:स्वप्नशमनं क्रुद्ध-स्वामि-चित्तप्रसादनम्‌ ॥१८१॥
षटकर्म अष्टमहासिद्धि त्रिकालज्ञानसाधनम्‌ ।
परकृत्य-प्रशमनं परचक्रविमर्दनम्‌ ॥१८२॥
सङ्ग्रामरड्गे सर्वेषाम्‌ इदम्‌ एकं जयावहम्‌ ।
सर्ववन्ध्यत्व-दोषघ्नं गर्भरक्षैककारणम्‌ ॥१८३॥
हे स्तोत्र सर्व कलहांचा नाश करणारे, जळलेल्या बीजासही अंकुरित करणारे, दुष्ट स्वप्नांचा नाश करणारे, क्रुद्ध झालेल्या स्वामीचे मन शांत करणारे, स्नान, संध्योपासना, दान, देवपूजा, अतिथिसत्कार आणि वैश्वदेव ही नित्य सहा कर्मे, आठ महासिद्धी व त्रिकालज्ञान यांचे साधन ठरणारे, शत्रूंच्या कृत्यांचा विध्वंस करणारे, परकीय आक्रमण परतविणारे, समरांगणावर सर्वांना हेच एक जय देणारे, सर्व प्रकारचा वंध्यादोष घालविणारे, गर्भाच्या रक्षणाचे मुख्य कारण असणारे आहे. ॥१८१-१८३॥
पठ्यते प्रत्यहं यत्र स्तोत्रं गणपते: इदम्‌ ।
देशे तत्र न दुर्भिक्षम्‌ ईतय: दुरितानि च ॥१८४॥
हे ‘गणपतीचे’ स्तोत्र जेथे दररोज म्हटले जाते तेथे दुष्काळ, अतिवृष्टी, अनावृष्टी, टोळ, उंदीर (ईतय:) इत्यादींचा उपद्रव होत नाही.