गणेशोत्सव

गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो.


पुण्यातील गणेश विसर्जन उत्सवाचा इतिहास

एकेकाळी गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुण्यात लोकांची गर्दी होत असे. आजही विसर्जन मिरवणुकीचा उत्साह कमी झालेला नाही. सन १८९३ पासून पुण्यातील सर्व गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे. पुण्यातील या गणपती विसर्जन मिरवणुकांचा इतिहास मंदार लवाटे यांनी 'पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षांचा' हा पुस्तकात दिला आहे. विसर्जन मिरवणुकीसंबंधीची दुर्मीळ छायाचित्रेरं आणि मिरवणुकीसंदर्भात घडलेल्या विविध घटनांची माहिती पुस्तकात आहे. पुण्याखेरीज महाराष्ट्रातही तसेच मुंबईइ.शहरातही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.